निलंगा :- लक्ष्मण पवार
निलंगा तालुक्यातील जामगा येथे इच्छापुर्ती एक दिवशीय श्रीनाथ महोत्सवाचे आयोजन सोमवार दि.14 फेब्रुवारी रोजी अचलबेट देवस्थान येथील हभप. हरी गुरूजी यांच्या किर्तन सेवेने करण्यात आली आहे.
जामगा येथील श्रीनाथ मंदीरा समोर अचलबेट देवस्थान येथील हभप. हरी गुरूजी लवटे महाराज यांची किर्तनसेवा संपन्न होणार आहे. सकाळी गाव प्रदक्षिणा झाल्यानंतर किर्तन होणार आहे. तदनंतर लगेच महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
या महोत्सवात जामगा, गुंजरगा, येळणूर, चांदोरी, बोरसुरी, मानेजवळगा, सावरी, सोनखेड, बोळेगाव, भुतमुगळी, हासोरी, हालसी हात्तरगा, तगरखेडा, हलगरा, थोर माकणी, बेंडगा, अनसरवाडा, दादगी, लिंबाळा, मदनसुरी, ममदापूर, सरदार वाडी, नेलवाड, कोराळी, पांचाळ नगर निलंगा यासह लामजना, पान चिंचोली, कुन्हाळी, मळगी, चिंचकोट, तलमोड, उमरगा, निलंगा तालुक्यातील बहुतांश गावातील व जामगा गावाच्या पंचक्रोशीतील भजनी मंडळी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जामगा ग्रामस्थांनी केले आहे.