बीड , दि . १३
बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने नुकतीच शिव सहकार सेनेची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिव सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष प्रदीपकुमार खोपडे यांनी मार्गदर्शन केले.
विना सहकार नाही उद्धार,सहकाराचा पाया मजबूत असेल तर छोटे छोटे संस्थानिके ताब्यात घेण्याची ताकद निश्चितच शिवसैनिकात निर्माण होईल,यासाठी येणाऱ्या काळात काळजीपूर्वक लक्ष देण्याचा मोलाचा सल्ला प्रदीपकुमार खोपडे यांनी शिवसैनिकांना दिला.
सेवा सहकारी सोसायटी,बचतगट,पतसंस्था, दूध संघ, मध्यवर्ती बँका, बाजार समित्या, यासारख्या विविध सहकारी संस्था केवळ गांभीर्याने न घेतल्यामुळे शिवसैनीकाच्या हातून निसटतात. शिवसेना नेते मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांतजी खैरे , उपनेते तथा मराठवाडा विभागीय समन्वयक विश्वनाथ नेरूरकर व शिव सहकार सेनेच्या राज्य प्रमुख शिल्पा सरपोतदार यांनी सबंध महाराष्ट्रात शिवसैनिकांना सहकाराचे महत्त्व जाणीव करून देण्यासाठी शिव सहकार सेनेची स्थापना केली असल्याचे प्रदीपकुमार खोपडे यांनी सांगितले.
सहकार क्षेत्रातले बारकावे माहित नसल्यामुळे व योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे केवळ विशिष्ट वर्गाची मक्तेदारी वाढत गेली.शिवसेनेच्या नवीन सहकार सेना शाखेच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढण्याचे काम निश्चित केले जाईल असे यावेळी मनोगत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, उप जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी बैठकीस शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक,माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे,किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक संगिता चव्हाण, न.प.माजी सभापती सुनिल अनभुले, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, तालुका प्रमुख उल्हास गिराम,युवासेना जिल्हाधिकारी सागर बहिर,अभिजीत बरिदे,शुभम डाके,उपजिल्हा प्रमुख रामराजे सोळंके, गेवराई तालुका प्रमुख कालिदास नवले,वडवणीचे विनायक मुळे,नगरसेवक संजय उडाण,आजिनाथ खेडकर,किरण चव्हाण,रत्नाकर शिंदे,गोरख सिंघण,संदीप माने,सुशील पिंगळे,रामदास ढगे,शिक्षक सेनेचे बहिरवाळ सर,सुधीर शिंदे,किसन कदम,साहेबराव पोपळे,पंकज कुटे,सुनील सुरवसे, प्रदीप माने,प्रदीप कोटुळे,नानासाहेब घाल्लाळ,उध्दव काकडे,नवनाथ शिंदे, बंटी धनवे,राजेश मोरे,महादेव आंधळे,सचिन धपाटे,मुकेश शिवगण,अक्षय काशीद,अरुण भोसले,गणेश जाधव,बंडू जाधव,सूर्यकांत जगताप यांच्यासह सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीसह ही शिव सहकार सेनेची आढावा बैठक पार पडली.
यावेळी शिवसेना,युवासेना पदाधिकारी,महिला आघाडी पदाधिकारी,शिवसेनेच्या सर्व अंगीकृत व अधिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक सेनेचे बहीरवाळ यांनी तर आभार गणेश जाधव यांनी व्यक्त केले.