अणदूर , दि.१२
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तुळजापूर तालुका विविध कार्यकारी सोसायटी गटातून तुळजाभवानी शेतकरी सह. साखर कारखाना संचलित गोकुळ शुगरचे चेअरमन तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुनील चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अणदूर ता . तुळजापूर येथील जयमल्हार पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पत्रकार सचिन गायकवाड म्हणाले की"गोकुळ शुगरच्या सहकार्याने सुनील चव्हाण यांनी दहा वर्षपेक्षा आधिक काळ बंद असलेला तुळजाभवानी साखर कारखाना चालू केला. त्यानंतर जिल्हा बँकेवर त्यांची बिनविरोध निवड झाली. हा दुग्ध शर्करा योग असून दोन्ही गोष्टी या शेतकऱ्यांशी निगडित आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित न्याय मिळेल,"असा आशावाद व्यक्त केला. यावेळी पत्रकार दयानंद काळुंके, अजय अणदूरकर,संजीव आलूरे, सचिन तोग्गी, आदी मान्यवर उपस्थित होते