जळकोट , दि . १२
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा तुळाजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण या़ंची उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बंजारा समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, बाजार समितीचे माजी सदस्य हरीष जधव, बंजारा परिषदेचे उपाध्यक्ष संजय राठोड ,गोरसिकवाडीचे जिल्हा संयोजक शिवाजी राठोड, लक्ष्मण राठोड, गोरसेनेचे तालुका अध्यक्ष राजु चव्हाण, उपाध्यक्ष कुमार राठोड, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष सुरेश राठोड, माजी उपसरपंच रामु चव्हाण, एम.पी.राठोड ,ग्रा.प. सदस्य सावंत पवार, विलास पवार, दिनेश राठोड, श्रीमंत चव्हाण,अमोल राठोड, नागनाथ पवार, ताराचंद पवार, विष्णू जाधव आदिजण उपस्थित होते.