नळदुर्ग , दि . १५ :
मंगळवार दि. १५ फेब्रुवारी रोजी जगतगुरु राष्ट्र संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त वसंतनगर येथे जि.प. प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा मनसेचे शहर संघटक रवि माणिक राठोड , बंजारा नायक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवि माणिक राठोड, उपाध्यक्ष रेशमा राठोड तसेच शालेय समितीचे सर्व सदस्यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेवक लक्ष्मण चव्हाण,सौ. विमलबाई राठोड , मुख्याध्यापक आर. आय. औसेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि बंजारा समाजातील नागरिक, शाळेतील सर्व शिक्षक, पोषण आहार कर्मचारी आदी उपस्थित होते.