नळदुर्ग , दि . १५ : विलास येडगे
भाजपाची मुलुख मैदानी तोफ व धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचा नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
दि.१५ फेब्रुवारी रोजी आमदार गोपीचंद पडळकर हे नळदुर्ग मार्गे जळकोट ता. येथील जि. प.चे माजी सदस्य गणेश सोनटक्के यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास जात असतांना ते नळदुर्ग येथील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव बसस्टँड समोर थांबले यावेळी नळदुर्ग येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या सत्काराचे आयोजन जन्मोत्सव समितीचे सल्लागार पद्माकर घोडके यांनी केले होते. आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार जन्मोत्सव समितीचे सल्लागार प्रभाकर घोडके व पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सुहास येडगे, अमर भाळे,राजु ठाकुर, दादा येडगे, कुणाल सोलंकर यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.