नळदुर्ग , दि . १५
स्पर्धेच्या युगात शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील बंजारा समाजाच्या तांड्यातील महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांनी राज्यासह परदेशात भारत देशाची मान उंचविण्याचे प्रेणादायी व कौतुकास्पद कार्य
केलेल्या विद्यार्थ्यांचा पञकार संघटनेच्यावतीने नळदुर्ग येथे गौरव करण्यात आला.
संत श्री सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती मंगळवार दि. १५ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग शहरातील अक्कलकोट रोड लगत बंजारा समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी नाव लौकीक मिळविलेल्या बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांना नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन पत्रकार विलास येडगे माजी नगरसेवक सुधिर हजारे, विनायक अहंकारी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नळदुर्ग जि.प. कन्या प्रशालेत शिक्षण घेणाऱ्या कुमारी प्रणिता मोहन पवार हिने श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पीयन स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवुन दिले, कोरोना कालावधित उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या बालाघाट महाविद्यालयाचा विद्यार्थी विक्रम माणिक राठोड, यास कोविड योध्दा म्हणून शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल, त्याच बरोबर याच महाविद्यालयातील अरुण सुधाकर नाईक याने एन.सी.सी. च्या वतीने घेण्यात आलेल्या ५३ महाराष्ट्र बटालियन परिक्षेत ए ग्रेड ने उत्तीर्ण होऊन तब्बल चार वर्षा नंतर महाविद्यालयाचे नाव उंचावल्या बद्दल अनुक्रमे या तिघांचा नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या वतीने फेटा, शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे ,पत्रकार विलास येडगे, उत्तम बणजगोळे, दादासाहेब बनसोडे, अजित चव्हाण, तानाजी जाधव, प्रसिध्दि प्रमुख शिवाजी नाईक, माजी नगरसेवक सुधिर हजारे, विनायक अहंकारी, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, संजय विठ्ठल जाधव, अमर भाळे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते बंडोपंत कसेकर, बंजारा समाजाचे जेष्ठ नागरिक नामदेव जाधव, बाबुराव राठोड, राजाराम नाईक, सुभाष पवार, नवल नाईक, अविनाश नाईक, फुलचंद जाधव, किरण नाईक, प्रदिप पवार, दगडू जाधव, आदिसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी नाईक यांनी केले. सुत्रसंचलन माजी नगरसेवक विनायक अहंकारी तर आभार पत्रकार तानाजी जाधव यांनी मानले.