नळदुर्ग , दि . १६
बंजारा समाजाच्या न्याय हक्क अधिकार करिता सातत्याने संघर्ष करणाऱ्या गोर सेना या सामाजिक संघटनेकडून संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राणा प्रताप नगर तांडा जळकोटवाडी ता. तुळजापूर येथील समाज मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्हा रुग्णालय उस्मानाबादचे रक्त संकलनासाठी टीम उपस्थित होती. गोर सेना या संघटनेकडून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हा उपाध्यक्ष लखन चव्हाण ,जिल्हा सहसचिव कुमार राठोड , तालुकाध्यक्ष राजू चव्हाण, वसंत महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, अमृता चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, अर्जुन राठोड ,गोविंद राठोड, रवींद्र राठोड, विलास राठोड, हरीश जाधव इत्यादींनी शिबिरास भेट दिली.