नळदुर्ग, दि. ८

राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर  अपशब्द लिहुन पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवार दि. ८ फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे.


निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, व्हाट्साप या सोशल मीडियावर तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर शरद पवार याच्याबद्दल  अपशब्द लिहल्याबद्दल सदरील व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याचे लेखी निवेदन तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक सिध्देश्वर गोरे याना देण्यात आले आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते गोकुळ शिंदे, तालुका अध्यक्ष धर्यशील पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य शफी शेख, जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताक कुरेशी, नळदुर्ग शहर अध्यक्ष मेहबूब शेख, जनक कदम पाटील, मलंग शेख, तोफिक शेख, शरद जगदाळे, अजित आण्णा, बाबूलाल शेख, आदी  उपस्थित होते.
 
Top