मुरुम, ता. उमरगा. ७  :

 शहरात माता रमाई यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त माता रमाई चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, यशवंत नगर, सिद्धार्थ कॉलनी येथे सोमवारी (ता. ७) रोजी अभिवादन करण्यात आले.


माता रमाई चौक, भीमनगर रोड येथे सम्राट युवा मंच व समस्त भीमनगरच्या वतीने विशाल भालेराव, रेवण गायकवाड, अरविंद कांबळे हिरालाल गायकवाड यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. 


यावेळी सिद्धांत गायकवाड,  अश्विन कांबळे, प्रशांत मुरूमकर, प्रदिप गायकवाड, अभिषेक कांबळे, सुरज गायकवाड, प्रशांत गायकवाड, अश्वजित दुरुगकर, आदित्य बनसोडे, अजिंक्य गायकवाड, सिद्धार्थ कांबळे, आदित्यबोधी गायकवाड आदी उपस्थित होते.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त मुख्याध्यापक  प्रविण गायकवाड व वैभव कांबळे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामुदाईक त्रिशरण पंचशील ग्रहण करून वंदन करण्यात आले. यावेळी किरण गायकवाड, आशिष गवई, आशुतोष गायकवाड, धम्ममित्र अजय गायकवाड, शीतल कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, श्रेयश गायकवाड, समीर सोमवंशी, विवेक भालेराव, विशाल सोनवणे, ऋतिक कांबळे, युवराज देडे, प्रसाद बनसोडे, यश मुरूमकर, आदित्य पाळेकर,भीमराव गायकवाड, मंगेश कांबळे, शुभम शिरोळे आदींची उपस्थिती
 होती.


सिद्धार्थ कॉलनी येथे माता रमाई यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त माजी पोलीस उपनिरीक्षक डी. एस. गायकवाड व सुशिला गायकवाड, कविता टिळक, औरंगाबादचे दमाया गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामुदायिक वंदना घेऊन जयंती उत्सव साजरी करण्यात आली. यावेळी धम्ममित्र सुनीता राम कांबळे, धम्ममित्र राम कांबळे, अजिंक्य मुरुमकर, अमर कांबळे, अभिजीत कांबळे आदी उपस्थित होते.
 
Top