नळदुर्ग ,दि . २३ : एस.के.गायकवाड
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि.२२ फेब्रुवारी रोजी नळदुर्ग येथे आयोजित जनता दरबारमध्ये नागरिकांच्या जाणून घेतल्या विविध समस्या
नळदुर्ग शहरातील विकास कामाला चालना मिळावी या उद्देशाने थेट जनतेतून समस्या जाणून घेण्यासाठी व त्या समस्येचे निवारण करण्याकरिता आमदार राणाजगजितसिह पाटील यांनी नळदुर्ग येथील नगरपरिषद कार्यालयाच्या प्रागंणात मंगळवारी जनता दरबार भरवला. या जनता दरबारास जनतेतून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून सभागृह बांधकाम, रमाई आवास,पंतप्रधान आवास घरकुल योजना, अंतर्गत रस्ते,गटार,पाणी पुरवठा, पथदिवे, पाण्याच्या टाकीचे बांधकामसह जवळपास २५० हून अधिक समस्या यावेळी नागरिकांनी लेखी स्वरूपात नोंदविल्या.
या जनता दरबारात लेखी स्वरुपात नोंदविलेल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी संबंधीत त्या त्या खात्यतील कर्मचारी व आधिकारी याना बोलविण्यात आले होते. प्रत्येकाने आपापल्या खात्यासी संबंधीत समस्यांचे निवारण केले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहर विकास कामाला चालना मिळावी म्हणून राबविलेल्या जनता दरबार या आनोख्या उपक्रमाबद्दल नागरिकांतून समाध व्यक्त केले जाते आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा अस्मिता कांबळे, नगरसेवक उदय जगदाळे, भाजपा शहराध्यक्ष धिमाजी घुगे, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, सुशांत भूमकर, श्रमिक पोतदार, संजय जाधव, जिलानी कुरेशी, सचिन घोडके, सुनील बनसोडे, दादासाहेब बनसोडे, सागर हजारे, रियाज शेख,रिपाइं (आठवले)चे शहराध्यक्ष दत्ता बनसोडे, कार्याध्यक्ष महादेव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कांबळे सुनील जाधव मुदस्सर शेख, कृषी मंडळ अधिकारी डि.डी.सरवदे, ए.व्हि. घिरडे, डी.पि.बिराजदार,नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे,पिराजी तायवाडे, नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल जानराव, महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रवीण गायकवाड, मंडळ अधिकारी जयंत गायकवाड, तलाठी तुकाराम कदम, नगरपालिका कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार,अजय काकडे, समीर मोकाशी आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.