नळदुर्ग , दि . ७ : विलास येडगे
नळदुर्ग येथील धर्मवीर संभाजी शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनिल गव्हाणे यांची निवड झाली असुन उपाध्यक्ष म्हणुन सनी भुमकर, राहुल जाधव,यांची तर सचिवपदी सुरज चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी पहिल्यांदाच मंडळाने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला असुन त्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. ही बैठक नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उमेश जाधव, धनाजी किल्लेदार, केदार स्वामी, मोनिश जाधव, संकेत स्वामी, सनी सुरवसे आदीजन उपस्थित होते. शिवजयंती साजरी करीत असताना सरकारने घालुन दिलेल्या कोरोना नियमांचे उल्लंघन न करता १७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिश्वर मुर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच १८ फेब्रुवारीला रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.