मंगरूळ , दि . ७
उस्मानाबाद येथील हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहेमतूल्लाह वेल्फेअर सोसायटी व माजी नगरसेवक सय्यद नादेर उल्लाह हुसैनि यांच्या वतीने मुस्लिम समाजातील गोरगरीब वधू वरांच्या विवाह सोहळ्याचे ( ५१ शादीयांचे ) आयोजन गेल्या चौदा वर्षांपासून केले जाते.
यावर्षीही कोव्हिड (१९ )च्या सर्व नियमांचे पालन करत रविवार २७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी सात वाजता आयोजन करण्यात आले असून यासाठी १ मार्च ते १५ मार्च पर्यंत नाव नोंदणी दारूल शमशिया मदरसा खाजा नगर उस्मानाबाद येथे करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे .
गेल्या चौदा वर्षांपासून सय्यद नादेर उल्लाह हुसैनि व त्यांच्या हजरत खाजा शंमशोद्दीन गाजी रहेमतुल्लाह वेल्फेयर सोसायटीच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील गोरगरीब वधू वरांच्या माता पित्यांना लग्नाचा (शादीचा ) नाहक त्रास होऊ नये. यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. लग्न सोहळ्यात सहभागी वधू वराकडून नोंदणी फीस ३ , ३ हजार घेऊन वधू वराना ३० ते ४० हजार रुपयांचे संसार उपयोगी साहित्य सोसायटीच्या वतीने दरवर्षी देण्यात येते.
कोरोनाच्या आजारात गेल्यावर्षी व याहीवर्षी यामध्ये खंड पडू न देता हा सामुदायिक विवाह सोहळा शासनाचे सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात संपन्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे .
यासाठी हजरत खाजा शंमशोद्दीन गाजी रहेमतूल्लाह वेल्फेअर सोसायटीच्या सर्व सभासद मेहनत घेतात आत्तापर्यंत सोसायटीच्या माध्यमातून तेरावर्षात ५७६ जोडपी विवाहबंधनात ( शादीयांत ) अडकली आहेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते , रिटायर्ड शिक्षक , पत्रकार , डॉक्टर , सामाजिक कार्यकर्ते , स्वयंसेवक व समाजातील दानशूर व्यक्ती आपापल्या परीने योगदान देतात मुस्लिम समाजातील सजग नागरिकांनी आपापल्या परिसरातील नावनोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले.