काटी , दि . ७
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील लक्ष्मीबाई दगडु गुंड वय (85) यांचे रविवार दि.(6) रोजी रात्री 11 वाजता राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी दहा वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन भागवत गुंड यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.