वागदरी ,  दि . ८ : एस.के.गायकवाड

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व कार्यामध्ये त्यांना समर्थ साथ देणारी त्यागमुर्ती महामाता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती मौजे वागदरी ता.तुळजापूर येते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

   
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजकुमार पाटील, उपाध्यक्ष फत्तेसिंगभाई ठाकूर ,परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारूती बनसोडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस आय.टी.सेलचे जिल्हाअध्यक्ष अमोल पाटील , सुर्यकांत सुरवसे,आदी होते.

   
प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, व महामाता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेण्यात आली.
  

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड यांनी  तर आभार  रमाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा उज्वला वाघमारे यांनी केले. 


  यावेळी बोलताना अमोल पाटील म्हणाले की माता रमाईने आपल्या जिवनाच्या अखेर प्रयत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात समर्थपणे साथ दिली असून रमाईचा आदर्श समोर ठेवून महिलानी सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी झाले पाहिजे. तर प्रमुख वक्ते म्हणून बोलताना मारुती बनसोडे म्हणाले की माता रमाईचे कार्य आपल्या भावी हजारो पिढीला प्रेरणादायी आहे.
   


यावेळी उपसरपंच मुक्ताबाई वाघमारे, ग्रा. प.सदस्य विद्याताई बिरादार, पंचशील बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष नागनाथ बनसोडे, माजी सैनिक कृष्णा वाघमारे, पो.काँ.संदिपान वाघमारे, धुळाप्पा वाघमारे, सहादेव वाघमारे, हणमंत वाघमारे,गुरूनाथ वाघमारे, कल्लापा वाघमारे, शिवाजी वाघमारे, बाबासाहेब वाघमारे,उत्तम झेंडारे,महिला कार्यकर्त्या कविता गायकवाड, ठकुबाई वाघमारे, कविता वाघमारे, कमळाबाई वाघमारे, गुनाबाई बनसोडे, कमल धाडवे, शिक्षाबाई जेटीथोर,राधाबाई वाघमारे,गिताबाई झेंडारे, जीजाबाई वाघमारे, कल्पना वाघमारे, युवा कार्यकर्ते भारत वाघमारे, धम्मा बनसोडे, मुकेश धाडवे, आकाश झेंडारे,विनोद पवार आदीसह कार्यकर्ते,  महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top