अणदुर , दि . ३

येथील अनेक वर्षे रेशन कार्ड विना रहात असलेल्या मर्गम्मा  कोळी कुटुंबातील व्यक्तींना रेशन कार्डाचे वाटप करण्यात आले. पौर्णिमा महिला बहुऊद्देशिय सामाजिक  संस्था अणदुर ता . तुळजापूर  यांच्या वतीने हे रेशन कार्ड देण्यात आले.


 गेली 30  ते 40 वर्षापासून हे लोक तुळजापूर तालुक्यातील  अणदुर येथे एक वस्ती करून राहात होते. भीक मागून उदरनिर्वाह करणे, हा यांचा मुख्य व्यवसाय आहे. या लोकांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नव्हता, रेशन कार्ड नव्हते. ते या संस्थेने पुढाकार घेऊन मिळवून दिले. गावातील काही  लोकांनी मदत केल्याने आज या 16 कुटुंबाला रेशन कार्ड मिळाले . 


तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार  सौदागर  तांदळे व नायब तहसीलादार  संदीप जाधव  यांच्या मदतीने हे फार मोठे काम झाले. यापुढे या कुटुंबांना शासनाचे रेशन मिळेल व त्यांचा उदरनिर्वाहचा प्रश्न मिटेल असे या संस्थेच्या अध्यक्षा बाबई चव्हाण यांनी या वेळी बोलताना सांगितले.


यावेळी  एकूण 16 कार्ड दिले गेले.  त्यात मर्गम्मा कोळी, एकल महिला ,एकल पुरूष असा समावेश आहे.  हे कार्ड दिल्यावर त्या लोकांनी मनापासून आभार मानले. यावेळी रेशन कार्ड सोबत मास्क,  सॕनिटायझर  मोफत वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य डॉ. विवेक बिराजदार, पौर्णिमा महिला संस्थेचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते
 
Top