नळदुर्ग , दि . ३
मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज व जेष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने महाराष्ट्र एका बहु्गुणी अभिनेत्याला मुकला आहे, असे प्रतिपादन युनिटी मल्टीकॉन्सचे मुख्य संचालक कफील मौलवी यांनी व्यक्त केले.
युनिटी मल्टीकॉन कंपनी प्रा.लि.सोलापूरच्या वतीने रमेश देव यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की 35 वर्षापूर्वी सर्जा या सुपर हिट मराठी चित्रपटातून नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला जगासमोर आणला. हा चित्रपट आपल्या नळदुर्गच्या किल्यात शूटिंग झाली होती. त्यामुळे नळदुर्गकर रमेश देव यांना कधीही विसरणार नाही.
युनिटीच्या माध्यमातून नळदुर्ग भुईकोट किल्ला संवर्धनासाठी घेतला आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन लोक येतात आणि सर्जा चित्रपटाची आठवण करतात. अशा महान कलाकाराला आमची भावपूर्ण श्रद्धांजली.