अणदूर , दि . ३ : अजय अणदुरकर 


नळदुर्ग येथील प्रसिद्ध, पावणारा लोकमान्य सांस्कृतिक मंडळाच्या गणपती मंदिरात प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी शुक्रवार दि . ४ फेब्रुवारी   श्री गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले  असुन त्याचा लाभ भक्त ,भाविकानी घ्यावा असे आवाहन लोकमान्य सांस्कृतिक मंडळाने केले आहे.


लोकमान्य सांस्कृतिक मंडळ व लोकमान्य व्यापारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  शुक्रवार रोजी खास गणेश जयंती निमित्त सकाळी 7 : 30 वाजता गणपतीस श्री व सौ राजकुमार पिचे,श्री व सौ संकेत खदे,श्री व सौ संजय दुबे, श्री व सौ गोपाळ देशपांडे यांच्या हस्ते महाअभिषेक व अन्नदान, दुपारी 12 वाजता गुलाल व जन्मोत्सव पाळणा, संध्याकाळी 6 वाजता व्यापारी मंडळ व लोकमान्य सदस्यांच्या हस्ते श्री ची महाआरती व महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पुरोहित वसंत रामदासी यांनी केले आहे.
 
Top