जळकोट, दि. ३ :

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्रशालेस जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला.


या भेटीत अस्मिता कांबळे यांनी इयत्ता नववी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांशी व सर्व शिक्षकांशी ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यास, सेमी इंग्रजी, १५ वर्षाच्या पुढील सर्वांना लसीकरण व विद्यार्थ्यांचे आरोग्य आदीबाबत संवाद साधून माहिती घेतली. या भेटी दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश सोनटक्के, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष शंकर वाडीकर, प्रभारी मुख्याध्यापक हनुमंत जाधवर, ,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी रोहिनी जाधव, संभाजीनगर भाग शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शकील मुलानी, गिरीश नवगिरे, संभाजीनगर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक धनराज रेणुके, शाळेचे शिक्षक प्रदीप तरमोडे, श्रीमती पुष्पलता कांबळे, गोविंद सोमवंशी, वैभव पटवारी, महेंद्र शिंदे,करुणा कांबळे आदी उपस्थित होते.
 
Top