उस्मानाबाद, दि. 3
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या होणा-या निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद निरीक्षक रविकांत राठोड हे शुक्रवार दि. ४ फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर येत असून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शासकीय विश्राम गृह शिंगोली येथे उपस्थित राहण्याच्या आवाहन युवा जिल्हाध्यक्ष दिलीप आडे यांनी केले आहे.