नळदुर्ग , दि . ५
नळदुर्ग येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातील शौचालय योजनेतील लाभार्थीना प्रोत्साहनपर तिसरा हप्ता रुपये तीन हजार मिळावे, यासाठी दीड ते दोन वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरपालिकेकडे पाठपुरावा केल्याने ती मागणी मान्य केली.
याप्रकरणी नगरपालिकेने जाहिर सूचना काढली. लाभार्थीना मनसेने जाहिर आव्हान करत पालिकेत अर्ज सादर करावेत अशी विनंती केली,व आतापर्यंत ८०० लाभार्थीना छापील अर्ज पुरविले व मनसेचे पदाधिकारी स्वतः जातिने या विषयात लक्ष घालून लाभार्थीना लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करीत असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले .