प्रतिकात्मक
नळदुर्ग , दि . २८
अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन एका ५५ वर्षीय इसमाच्या डोक्यात अवजड वस्तुने मारुन निर्घृण खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कालव्यात टाकल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथे घडल्याची फिर्याद मयताच्या भावाने पोलिसात दिल्यावरुन अज्ञात मारेक-याविरुध्द नळदुर्ग पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे : इंदिरानगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील संजय हनुमंत कोळी, वय 55 वर्षे यांचा दि. 24- 25.02.2022 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी काहीतरी अवजड वस्तू डोक्यात मारुन खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संजय कोळी यांचा मृतदेह नळदुर्ग ग्रामस्थ- सुधीर पाटील यांच्या शेतातील कॅनलमधील पाण्यात टाकला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- लक्ष्मण हनुमंत कोळी यांनी दि. 27.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.