तुळजापूर , दि . २८
सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उस्मानाबाद संघाने तीन सुवर्ण पदक, तीन रौप्य पदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच टीम इव्हेंट मध्ये चमकदार कामगीरी करत उस्मानाबाद जिल्हा संघाने रौप्य पदकाची कमाई केली. यशस्वी खेळाडूंचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन आणि सांगली जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठवी सबज्युनियर राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा दि. २५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा संघाने घवघवीत यश प्राप्त केले.
या संघाला प्रशिक्षक संजय नागरे, हेमंत कांबळे, राहुल जाधव, जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संदीप गंगणे, सचिव शेख यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
● सुवर्ण पदक ●
यश हुंडेकरी ( मुले एकेरी) , प्रियांका हंगरगेकर ( मुली एकेरी) कृष्णा थिटे व यश हुंडेकरी (मुले दुहेरी)
● रौप्य पदक ●
कृष्णा थीटे (मुले एकेरी) , प्रियांका हंगरगेकर, यश हुंडेकरी (मिश्र दुहेरी) , कृष्णा थिटे, उन्मेष माळी, यश हुंडेकरी, प्रथमेश अमृतराव, समर्थ शिंदे, श्रेयस गायकवाड, हर्षवर्धन गुळवे ईत्यादी.