नळदुर्ग , दि . ०१ : विलास येडगे

 नळदुर्ग शहरात मंगळवार  दि.१ मार्च रोजी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी शहरांतील प्राचिन व वर्षातुन फक्त एकदाच महाशिवरात्री रोजी उघडले जाणाऱ्या पुराणिक यांच्या वाड्यातील भुयारात असणाऱ्या श्री महादेव मंदिरात भाविकांनी श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी  भाविकांची गर्दी उसळली होती. त्याचबरोबर श्री क्षेत्र रामतीर्थ व मैलारपुर येथील जुन्या श्री खंडोबा मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
       

दि.१ मार्च रोजी संपुर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. नळदुर्ग शहरातही महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात पुराणिक यांच्या वाड्यात जमिनीच्या आतमध्ये भुयारात अतीशय प्राचीन श्री महादेव मंदिर आहे. या मंदिराराला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे हे मंदिर वर्षातुन फक्त एकदाच महाशिवरात्री रोजी भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते इतरवेळी हे मंदिर बंद केले जाते. या मागचा इतिहास काय आहे हे कुणाला माहीत नाही. वर्षातुन एकदाच उघडले जाणाऱ्या या महादेव मंदिरात श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. या मंदिरात पहाटे पासुनच श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. याठिकाणी सुधीर पुराणिक, सुबोध पुराणिक व सुहास पुराणिक हे भाविकांना मंदिरात जाऊन श्री महादेवाचे व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी प्रयत्न करीत होते.
     
 त्याचबरोबर श्री क्षेत्र रामतीर्थ येथील श्री महादेव मंदिरातही श्री महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच शहरांतील हुतात्मा स्मारकासमोर टेकडीवर असलेल्या श्री महादेव मंदिरातही भाविकांची मोठी गर्दी दिसुन आली.त्याचबरोबर नळदुर्ग (मैलारपुर) येथील जुन्या खंडोबा मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
 
Top