काटी , दि . ४ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयांना शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शुक्रवार दि. 4 रोजी भेटी दिल्या. या दौऱ्यात प्रथम त्यांनी मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या तामलवाडी येथील त्र्यंबकेश्वर शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्यालयास भेट देऊन दौऱ्यास प्रारंभ केला.
यावेळी त्र्यंबकेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बसवणप्पा मसुते उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिकार्जुन मसुते, चंद्रकांत मसुते, बाळासाहेब जगताप, प्राचार्य एस.के.जाधव, सचिव यशवंत लोंढे,अब्बास पटेल,गोरख माळी, तुळजापूर तालुका शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत साळुंके, तालुकाध्यक्ष एस.के. वडणे, चेअरमन भास्कर पवार आदींनी शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर त्यांनी तालुक्यातील मॉडर्न हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगवी (काटी), जि.प.प्रशाला सावरगाव, येडेश्वरी प्रशाला काटी, जि.प. प्रशाला काटी, मनाल इंग्लिश स्कूल काटी, छत्रपती शाहू महाराज मसला (खुर्द), जि.प. प्रशाला माळुंब्रा, इंदिरा प्रशाला व जि.प. प्रशाला मंगरुळ, वसंतराव पाटील प्रशाला नांदुरी, जि.प. प्रशाला काटगाव, नरेंद्र बोरगांवकर प्रशाला देवकुरुळी, छत्रपती शिवाजी प्रशाला पिंपळा (खुर्द) या शाळेना भेटी देऊन शिक्षक, प्राध्यापक,मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या बहुतांश सोडवण्याचा प्रयत्न केला.
तामलवाडी येथे संस्थाचालक बसवणप्पा मसुते व शिक्षक यांनी प्रचलित धोरणानुसार वेतन, पवित्र पोर्टल बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावर येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देऊन शासन निर्णय व शासनाच्या भूमिकेबद्दल शिक्षकांशी चर्चा केली. याप्रसंगी शिक्षकांनीही मेडिकल कॅशलेस, आधार बेस संच मान्यता, एनपीएस, डिसीपीएस,आदी विविध विषयांवर आमदार विक्रम काळे यांच्याशी चर्चा केली. यावर शिक्षकांसाठी मेडिकल कॅशलेस सुविधा प्राधान्याने लागू करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळ समृद्ध करणार....
वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात.
शालेय जीवनापासून ही ‘वाचन प्रेरणा’ विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात ‘सशक्त व सक्षम’ अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वाचन चळवळ अधिक व्यापक व्हावी याकरिता विभागातील हायस्कूलला 25000/- हजार रुपयांची पुस्तके भेट देणार असे आश्वासन आमदार विक्रम काळे यांनी दिले.
सिरॅमिक बिल्डिंग मटेरियल वतीने स्वागत...
या दौऱ्या दरम्यान तुळजाभवानी महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. राजेंद्र घाडगे यांच्या तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील सिरॅमिक बिल्डिंग मटेरियल दुकानास सदिच्छा भेट दिली. यावेळी प्राध्यापक राजेंद्र घाडगे यांनी त्यांचे शाल, फेटा, पुष्पहार घालून स्वागत केले.
काटी येथे स्वागत
काटी येथे मनाल इंग्लिश स्कूल, येडेश्वरी प्रशाला, जि.प. प्रशालेच्या भेटी दरम्यान विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मनाल इंग्लिश स्कूलचे संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर शेख, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर यांनी आमदार विक्रम काळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी शामरावजी आगलावे, बबन हेडे, सहशिक्षक सुहास वडणे, चंद्रकांत साळुंके, जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक अहमद सय्यद, युवा नेते मोहन जाधव,रामेश्वर लाडूकर,बळी चवळे, मधुकर साळुंके, भैरवनाथ काळे,श्रावण वाघमारे बाळासाहेब शिंदे , अनिल शिंदे,सुमित शिंदे,नीलकंठ गाटे,धनंजय गाटे,गफार शेख , रहेमान शेख,शाहरुख शेख आदी मान्यवर उपस्थित होते.