नळदुर्ग, दि. ४

बंजारा समाजाचे लोप पावत चाललेल्या संस्कृती जोपासण्याच्या दृष्टीने समाज बांधवांनी संत श्री सेवालाल महाराज जयंती सर्वत्र विविध सांस्कृतिक व सामाजिक उमक्रम राबवून साजरी करण्याचे आवाहन जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण यांनी नळदुर्ग येथे आयोजित बैठकित बोलताना केले.

संत श्री सेवालाल महाराज यांची 283 वी जयंती दि. 15 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यासाठी नळदुर्ग येथे शुक्रवार दि. 4 फेब्रुवारी रोजी बी.के. फंक्शन हॉल या ठिकाणी बंजारा समाजाच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, डॉ. सुभाष राठोड, जेष्ठ नागरिक अम्रता चव्हाण, सोसायटीचे चेअरमन हरिश जाधव, माजी सैनिक मोतिराम चव्हाण, माजी सैनिक नामदेव पवार, गोरसेनेचे तालुकाध्यक्ष राजु चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य कुमार राठोड, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


या बैठकीत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करताना अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक व सांस्कृतिक, विधायक कार्य करण्याबरोबरच आजच्या तरुण पिढिला संत श्री सेवालाल महाराज यांच्या कार्याविषयी समाज प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याबद्दल सकारात्मक चर्चा व विचार विनिमय करण्यात आला. तसेच अनेक मान्यवरांनी मनोगतातुन आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास पत्रकार शिवाजी नाईक, पत्रकार सतिश राठोड, पत्रकार अजित चव्हाण,‍ रवि राठोड, दत्ता राठोड, जाधव रुपचंद, संतोष राठोड, अवि चव्हाण, जगदिश राठोड, रोहन राठोड, नवल नाईक, लक्ष्मण राठोड, संजय राठोड, रेकु जाधव, राठोड शेखर, किरण राठोड, प्रभाकर राठोड, संदीप राठोड, बाबु जाधव, शुभम राठोड, अमोल राठोड, बाळु जाधव , सचिन जाधव, राठोड मारुती यासह नळदुर्ग परिसरातील बंजारा समाज बांधव‍ उपस्थित होते.
 
Top