नळदुर्ग दि. ५
एआयएमआयएम पार्टीचे खासदार असोदोद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याचा नळदुर्ग ऑल इंडीया मजलीस इतेहादुल्ल मुस्लिमन नळदुर्ग शाखेच्या वतीने निषेध करून खासदार आसोदोद्दीन यांना झेड सुरक्षा देऊन दोषीवर कारवाई करण्याचे निवेदन केंद्रिय गृह मंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे नमुद केले आहे की, एमआयएम पार्टीचे खा. आसोदोद्दीन ओवैसी यांच्यावर कांही समाज कंटकानी जीवघेणा हल्ला केला. त्यातून ते बचावले. यापूर्वीही दिल्ली येथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

ओवैसी यांना उत्तम संसद पट्टू म्हणून पुरस्कारीत केले असून ते राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्या सोबत अशा निंदनीय घटना घडणे ही बाब अत्यंत संशयकारक आहे. सदरील घटनेचा आम्ही निषेध नोंदवित असून खा. ओवैसी यांना गृहमंत्रालयाने झेड सुरक्षा द्यावी. हल्या मागील दोषींना त्वरीत अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी करुन नळदुर्ग पोलिस ठाणे येथे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर मन्सुर शेख, युसूफ शेख, वसीम कुरेशी, गौस रजवी यांच्या सह्या आहेत.