नळदुर्ग ,दि . २६ : 

शिवसेना जिल्हा प्रमुख , आमदार  कैलास  पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहिटणा  ता . तुळजापूर येथे जनशुभदा फाउंडेशन व शिवसैनिकांच्या वतीने गावात मोफत नेत्र तपासणी व  रक्तदान शिबीर घेण्यात आले.

  सुरवातीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आभिवादन करण्यात आले. त्यानंतर  शिबिराला सुरवात झाली. यावेळी गावचे सरपंच अप्पसाहेब बिराजदार ,जनशुभदा फाउंडेशनचे संस्थापक अधक्ष तथा उपसरपंच सोमनाथ गुड्डे,  ,युवासेना उपतालुक प्रमुख सुनील कदम,  नागनाथ पाटील, शिक्षण समिती अधक्ष धनराज कदम,अनिल कदम,स्वामींनाथ राचेट्टी, अण्णा कदम,दत्ता कुंभार,प्रवीण बिराजदार ,ओंकार  नागरसे, राहुल गुड्डे, सैपन शेख, ग्रामपंचायत कर्मचारी, शिवसैनिक व ग्रामस्थ  उपस्थित होते.

 बॅनर बाजी किंवा वाढदिवस हे धुमधडाक्यात साजरा न करता या निमित्याने नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम  राबवण्याचा मनोदय  सोमनाथ गुड्डे यांनी व्यक्त  केले.
 
Top