काटी , दि . २१ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे शनिवारी शिवजयंतीनिमित्त तुळजापूर रोटरी क्लब, रोटरी नेत्र रुग्णालय व सानवी केक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 10 ते 5 या कालावधीत घेण्यात आलेल्या शिबिरात 75 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घघाटन रोटरी क्लबचे सदस्य आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तुळजापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष रामचंद्र गिड्डे , तामलवाडी पोलीस स्टेशनचे साहय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन पंडीत यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे सदस्य आप्पासाहेब पाटील यांनी जागतिक स्तरावरील रोटरी क्लबचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून जागतिक स्तरावर रोटरी क्लब एक समाजसेवेचे मंदीर असून या मंदिराच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तीने सुरु असलेले समाजोपयोगी कार्य एखाद्या देवदुताप्रमाणे अविरत सुरु असल्याचे सांगितले.
याप्रसंगी सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी, जि.प. सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून सुरु असलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल कौतुक केले. या शिबिरात रोटरी क्लबच्या वतीने शिबिरार्थी रुग्णांना मोतीबिंदू, काचबिंदू डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेण्याबाबत सल्ला देण्यात येऊन शस्त्रक्रियेची गरज पडल्यास रोटरी क्लबच्या वतीने उस्मानाबाद रोटरी नेत्र रुग्णालयाच्या वतीने मोफत केली जाणार असल्याचे आवर्जून सांगितले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब तुळजापुरचे अध्यक्ष रामचंद्र गिड्डे ,आप्पासाहेब पाटील,रो.दत्ता अंबर,रो.अनिल रोचकरी, रो.रुपाली गुंड यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अमोल गुंड यांनी तर आभार मगर बंधु यांनी केले.