तुळजापूर ,  दि .५ :

संस्कार भारती  देवगिरी  प्रांताच्या स्वाधिनता का अमृत महोत्सव निमित्ताने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेमध्ये महिला गटामधून नांदेड येथील डॉ. वैशाली गोस्वामी यांनी सादर केलेल्या राजमाता जिजाऊ भूमिकेला प्राप्त झाला तर किशोरी गटामधून झाशीची राणी लक्ष्मीबाई साकारणाऱ्या कु. प्रतीक्षा चंद्रकांत कायदाने यांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. राज्यभरातील महिला आणि मुलींनी संस्कार भारतीच्या या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.


संस्कार भारती देवगिरी प्रांत यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या स्वाधिनता का  अमृत महोत्सव या अंतर्गत महिला व किशोरी मुलीसाठी वेशभूषा स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. क्रांतिकारक व समाज सुधारकांच्या भूमिका यावेळी स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी व्हिडिओद्वारे सादर केल्या होत्या व भूमिकेचे व्हिडीओ संयोजकाकडे पाठवले होते. 


त्याचे परीक्षण तज्ञ परीक्षकांच्या मार्फत करण्यात आले .या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ऑनलाइन पद्धतीने ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न झाला. याप्रसंगी प्रांताचे अध्यक्ष भरत लोळगे, प्रमुख अतिथी नाट्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. संपदा कुलकर्णी ,महामंत्री डॉ.जगदीश देशमुख, सहकोष प्रमुख अभय शृंगारपुरे, प्रांत मातृशक्ती प्रमुख श्रीमती स्नेहल पाठक, प्रांताच्या नाट्य विधा प्रमुख श्रीमती सुनीता घाटे, यांची याप्रसंगी उपस्थिती होती. प्रारंभी कु. मिताली सातोनकर, कु. पूर्वा कुलकर्णी, कु. उन्मनी बोरीकर यांनी हे गीत सादर केले.



या स्पर्धेमध्ये महिला गटामधून प्रथम क्रमांक नांदेड येथील डॉ.वैशाली गोस्वामी, द्वितीय पारितोषिक सौ सुवर्णा कळसे नांदेड, तृतीय पारितोषिक विभागून ज्योती गाडगीळ अंबरनाथ, सौ मनीषा देशपांडे चाळीसगाव व उत्तेजनार्थ सौ. लता जोशी माजलगाव यांना देण्यात आले.

किशोरी गटामधून प्रथम पारितोषिक कु. प्रतीक्षा चंद्रकांत कापदाने जळगाव, द्वितीय पारितोषिक कु. कसक खंडेगावकर नांदेड, तृतीय पारितोषक कु. आस्था किशोर भालेराव इंदेवाडी जालना, व उत्तेजनार्थ कु.आर्या विठ्ठल कुलकर्णी परतुर यांना प्रदान करण्यात आले. 


पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रारंभी प्रांताचे महामंत्री डॉ. जगदीश देशमुख यांनी प्रास्ताविक पर विचार मांडले. प्रमुख अतिथी डॉ.संपदा कुलकर्णी यांनी याप्रसंगी परीक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आणि स्पर्धकांना सूचना केल्या .मातृशक्ती प्रमुख स्नेहल पाठक यांनी मार्गदर्शन केले . प्रांतसह कोष प्रमुख अभय शृंगारपुरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शर्वरी सकलकर आणि आभार प्रदर्शन सौ.स्मिता लिंबगावकर यांनी मानले. प्रांताची ही वेशभूषा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दत्तप्रसाद गोस्वामी व शेषनाथ वाघ यांनी परिश्रम घेतले.
 
Top