नळदुर्ग , दि . ५
शेतक-याच्या व कामगारांच्या हितासाठी श्री . तुळजाभवानी साखर कारखाना सुरु केल्याबद्दल नळदुर्ग येथील लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पुदाले यांच्या वतीने जि. प. सदस्स बाबुराव चव्हाण व राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनिल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
शेतकऱ्यांची कामधेनु म्हणून ओळख ठरलेल्या श्री . तुळजाभवानी शेतकरी सहकारी कारखाना भाडेतत्वावर घेऊन विकासाची गंगा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी हा कारखाना सुरु केला. तुळजापूर तालुक्यातील शेतकरी हा कारखाना बंद पडल्यामुळे रसातळाला गेला होता. पण आता कारखाना चालु झाल्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मिटला आहे. लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष शशीकांत पुदाले, नळदुर्ग दूध संघाचे माजी अध्यक्ष राजा ठाकूर, अनिल पुदाले, शुभम डुकरे, आकाश पुदाले, संतोष गहिरवार, अक्षय भोई व मित्र परिवाराच्या वतीने जि.प. सदस्य बाबुराव चव्हाण , काँग्रेस प्रदेश सचिव सुनिल चव्हाण यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.