काटी , दि . ५

 तुळजापूर तालुक्यातील काटी  येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत शनिवार दि.(5) रोजी पालकांची बैठक होवुन सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. या निवड प्रक्रियेतून  शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नजीब खलील काझी यांची तर उपाध्यक्षपदी सौ.पल्लवी बळीराम जामगावकर  यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


 निवडीनंतर नुतन अध्यक्ष नजीब काझी व उपाध्यक्ष सौ. पल्लवी जामगावकर यांचा शाळेचे मुख्याध्यापक अमीन शेख यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
         

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अमीन शेख , सहशिक्षक शेळके तानाजी शेळके, राजेंद्र कापसे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे नुतन सदस्य,पालक,  शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
 
Top