जळकोट, दि.३
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील रहिवासी उमरगा तालुक्यातील माडज बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव सुरवसे हे ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल जळकोट ता . तुळजापूर येथे कृतज्ञता गौरव समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवाजीराव सुरवसे यांचा विविध क्षेत्रातील मान्यवराकडून सत्कार करण्यात आला.
शिवाजीराव सुरवसे हे गेल्या ३८ वर्ष दहा दिवसापर्यंत शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. शिवाजी विद्यालय, निलंगा येथे प्रथम दोन वर्षे दोन महिने सेवा बजावल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रुजू झाले. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी अशा पदांवर एकूण ३६ वर्ष दहा दिवस त्यांनी काम केले. शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. बी. ए., एम. एड. त्यांनी पदवी ग्रहण केली होती. त्याचबरोबर साहित्य सुधाकर ही पदवी मिळवली होती. शालेय व्यवस्थापन पदविका प्राप्त केली होती. त्यांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी, लमाण तांडा, हंगरगा नळ, निलेगाव, नंदगाव , उमरगा तालुक्यातील कदेर येथे अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवले आहेत.
ते सध्या उमरगा तालुक्यातील माडज बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. शिवाजीराव सुरवसे यांना मराठा सेवा संघ, प्रेरणा पुरस्कार, तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार व नुकताच गरुड झेप फाउंडेशनचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
शिवाजीराव सुरवसे यांचा माजी विद्यार्थी, सहकारी शिक्षक, केंद्रीय विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, मित्रमंडळी, कीर्तनकार, वकील मंडळी,नातलग, पत्रकार मित्र, शिक्षक संघटना आदींनी उपस्थित राहून सुरवसे यांचा कृतज्ञता सोहळ्यात गरव केला. व त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात काहींनी कवितेतून तर काहींनी मनोगतातून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. अनेकांनी त्यांच्या आदर्श कुटुंबाचा मनोगतातून उल्लेख केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच अशोकराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सहचिटणीस महेश कदम, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, शिवसेना तालुका उपप्रमुख कृष्णात मोरे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष बसवराज कवठे, ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम,तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डी. डी. कदम ग्रामपंचायत सदस्य संजय माने, अनिल छत्रे, संजय अंगुले, किरण कदम, माजी गटशिक्षणाधिकारी देविदास बनसोडे, माजी विस्ताराधिकारी बाबुराव पवार, विस्ताराधिकारी मल्लिनाथ काळे, विस्ताराधिकारी बाळू महाबोले, सुनील कदम,प्रयाग मल्टीस्टेटचे चेअरमन सचिन कदम, ब्रह्मानंद कदम, मुख्याध्यापक प्रवीण स्वामी, मुख्याध्यापक धनराज रेणुके, मोहन माने, ज्ञानदेव जाधव, मुल्ला, विठ्ठल जाधवर, वैजनाथ कुंभार, कलीम शेख, बालाजी माळी, समिर जाधव, उमेश भोसले, जगताप, सिद्धेश्वर कुंभार, कुलकर्णी, व्यंकट ईटकरी आदि उपस्थित होते.