उस्मानाबाद , दि . ७

आगामी काळात  उस्मानाबाद जिल्ह्यात  होणा-या जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणूक वंचित आघाडी सर्व जागा निवडणूक लढविणार असुन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा राज्य कार्यकारिणी सदस्य व उस्मानाबाद जिल्हा निरीक्षक रविकात राठोड  उस्मानाबाद हे उस्मानाबाद येथे नुकतेच आले होते.  


 या बैठकीत उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी व  वंचितचे  उमेदवार निवडून आणण्यासाठी पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी शर्थीचे   प्रयत्न करण्याचे आहवान राठोड यानी केले. 


यावेळी बालाजी शिंगे प्रभारी लातूर  जिल्हा अध्यक्ष बी.डी.शिंदे  युवा अध्यक्ष दिलीप आडे , बाबासाहेब जानराव महासचिव, आर.एस.गायकवाड सहसचिव, धनंजय सोनटक्के महासचिव, अॕड,एल.जी.खुने जिल्हा उपाध्यक्ष ,शितल चव्हाण जिल्हा युवा नेते ,वैभव गायकवाड युवाजिल्हा उपाध्यक्ष, स्वप्निल लष्करे उपाध्यक्ष, जिवन कदम ,बाबासाहेब वाघमारे, अंकूल वाघमारे आदीसह  कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top