अणदूर , दि . ६
"लता दिदीच्या निधनाने संगीत क्षेत्राची प्रचंड हानी झाली असून ती कधीही भरून येऊ शकत नाही, संगीत हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे, प्रत्येक मनुष्याच्या जीवनात संगीताला,अनन्य साधारण महत्व आहे, तो अजरामर आवाज आज आपण हरवून बसलो आहोत".असे उदगार अणदूरचे उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार यांनी काढले. ते लता मंगेशकर यांना, खडकाळी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमात बोलत होते,
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉ जितेंद्र कानडे, डॉ हरिदास मुंडे यांची होती, पुढे बोलताना डॉ. कुंभार म्हणाले की गानकोकीळा,भारत रत्न स्व. लता मंगेशकर यांनी जगात भारताची मान उंचावण्याचे महान कार्य आयुष्यभर केले हे आपणास कधीही विसरता येत नाही,त्यांच्या जाण्याने,भारताची फार मोठी हानी झाली आहे, या वेळी "ये मेरे वतन के लोगो", "ने मजसी ने परत मात्र भूमीला सागरा प्राण तळमळला या दोन्ही अजरामर गीताचे गायन करण्यात आले,या वेळी लता दिदींना खडकाळी मॉर्निंग ग्रुप तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,
यावेळी प्रा. एम. बी. बिराजदार, आप्पू धमुरे, अविनाश मोकाशे, सचिन ढेपे, अनिल घुगे, पप्पू धमुरे, बाबुराव मूळे, सुहास कंदले, मल्लिनाथ नरे, संजय मोकाशे, पत्रकार चंद्रकांत गुड्डे, अजय अंदूरकर, पद्माकर जेवळे आदी मान्यवर उपस्थित होते.