तुळजापूर , दि . १२
तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे पाटोदा गावचे आदर्श सरपंच पेरे पाटील यांच्या हस्ते जिल्हा आदर्श ग्रामसेवक पूरस्कार मिळालेले ग्रामसेवक देवानंद रेड्डी यांचा सिंदफळ ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला .
यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सज्जनराव साळुंखे, राज्य समन्वयक आबासाहेब कापसे, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ अर्चना पाटील यांच्यासह सिंदफळ गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.