वागदरी , दि . १२ : एस.के.गायकवाड
महाराष्ट्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दोन तिन महिन्यापासून एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करण्याचा प्रश्न शासनाने भिजत ठेवल्यामुळे एसटी बस सेवा बंद असल्याने शाळा सुरु, बस सेवा बंद अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खासगी वहान वेळेत न मिळाल्यास शिक्षणासाठी नळदुर्ग ते वागदरी ता.तुळजापूर प्रसंगी सहा ते सात कि.मी. पायी चालत जावे लागत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लटेला सामोरे जात शासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन करित ग्रामीण भागात इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शाळा आँफलाइन सुरू झालेल्या आहेत. परंतु एसटी कर्मचारी आणि महाराष्ट्र शासन यांच्या विलीनीकरणाच्या वादात गेली दोन तिन महिने झाले एसटी कर्मचारी दुखवट्यात असल्याने एसटी बस सेवा बंद स्थितीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी जवळपास जिथे शिक्षणाची सोय आहे तिथे जावे लागले.
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी, गुजनूर, गुळहळ्ळी, दहिटणासह परिसरातील अनेक गावातील विद्यार्थ्यांना नळदुर्ग व अणदूर याठिकाणी शिक्षणासाठी ये - जा करावी लागते. नळदुर्ग पासून वागदरी हे गाव ७ कि.मी.अंतरावर आहे. स्वखर्चाने खासगी वहान वेळेत न मिळाल्यास नळदुर्ग ते वागदरी सात कि.मी.अंतर विद्यार्थ्यांना पायी चालत जावे लागत आहे. एसटी बसेस बंद असल्याने विद्यार्थ्यांना एसटीचा पास दिला जात नाही. त्यामुळे मोलमजुरी करून आपल्या मुलांना शाळेत पाठविणाऱ्या पालकांना आर्थिक आडचणीला सामोरे जावे लागत आहे. मुलीसाठी मोफत पास ही योजना व विद्यार्थ्यांना मिळाणारा एसटी पास विलनीकरणात आडकला आहे. त्यामुळे पालकावर आर्थिक बोजा पडत आहे.
यामुळे ग्रामीण भागातील पायी चालत जावून शिक्षणासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांची किव शासनाला कधी येणार. ग्रामीण भागातील एसटी बस सेवा कधी चालू होणार आसा चिंताजनक प्रश्न विद्यार्थी व पालक विचारत आहेत.