नळदुर्ग, दि. २५

बारा वर्षे बंद पडलेला श्री.तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना केवळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी  सुरू केले आले असून नुकतेच  १ हजार १०१ पोते साखर उत्पादित झाली आहे.  शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य  देणार असुन भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडी अडचणी दुर होणार असल्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

नळदुर्ग येथिल  श्री.  तुळजाभवानी साखर कारखाना सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा देवुन कामगाराना न्याय दिल्याबद्दल  माजी मंञी मधुकरराव चव्हाण यांचा   आणि काँग्रेस प्रदेश सचिव तथा तुळजाभवानी कारखानाचे चेअरमन सुनील चव्हाण यांची उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंञी मधुकरराव  चव्हाण हे बोलत होते.


याप्रसंगी नळदुर्ग शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष  सुहास येडगे , सचिव सुनिल गव्हाणे, जेष्ठ पञकार  विलास येडगे , तानाजी जाधव , शिवाजी नाईक , उत्तम बणजगोळे , अजित चव्हाण , माजी नगरसेवक  सुधीर हजारे , बसवराज धरणे ,  सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे ,  गणेश मोरडे , राहुल जाधव , नाभिक समाजाचे राजेंद्र महाबोले ,  प्रदिप ग्रामोपध्य आदी उपस्थित होते.
 
Top