वगदरी , दि . १६ : एस.के.गायकवाड


वागदरी ता.तुळजापूर येथे दि.१७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी  दरम्यान श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व श्रीमद भागवत कथा महायज्ञ व सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
  

प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी दि. १७ ते २४ फेब्रुवारी२०२२ दरम्यान मौजे वागदरी ता.तुळजापूर येथे श्री संत भवानसिंग महाराज भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ वागदरी यांच्या वतीने ह.भ.प.राजकुमार पाटील यांच्या आधिपत्याखाली व भागवत कथा आभ्यासक ह.भ.प.साधवी अनुराधा दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण व श्री मद भागवत कथा महायज्ञ सप्ताह व सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून. दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक ६ वाजता गाथा पूजन, कलश पूजन, विना पूजन मृदंग पूजन व टाळ पूजन करून या सोहळ्याची विधीवत सुरूवात होणार आहे.  दि .१७ ते २३ फेब्रुवारी  दरम्यानच्या काळात ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज दिंडेगावकर, राम गायकवाड महाराज चिकुंद्रा,धनाजी जाधव महाराज येडोळा, प्रल्हाद सरडे महाराज नांदुरी, महेश महाराज माकणीकर,फुलचंद महाराज रिंगणीकर,आबा पाटील महाराज कुरनुर आदींच्या किर्तनाचे व विविध गावातील भजनी मंडळाच्या हरी जागर भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  दि.२४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.श्रीहारी ढेरे महाराज यांच्या काल्याच्या किर्तना नंतर महाप्रसादाने या सप्ताह सोहळ्याची सांगता होणार  आहे. 
  

 तरी भावीक भक्तानी मोठ्या संख्येने या सप्ताह सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन समस्त वागदरी ग्रामस्थ मंडळीच्या वतीने करण्यात येत आहे.
 
Top