जळकोट, दि. २
जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषद उस्मानाबाद शालेय शिक्षण समितीचे सदस्य प्रकाश चव्हाण यांनी जिल्हा परिषद प्रशाला जळकोट ता . तुळजापूर येथे सदिच्छा भेट दिली.
भेटी दरम्यान इयता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यासाबाबत संवाद साधला. इयता दहावीची सराव परीक्षा चालू होती.
शालेय विद्यार्थीचा अभ्यास व उपस्थितीबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यशवंत पाटील, ब्रह्मानंद कदम, शिवराम कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा टोणपे ,शिक्षक हनुमंत जाधवर, प्रदीप तरमोड, श्रीमती पुष्पलता कांबळे, वैभव पटवारी , महेंद्र शिंदे हे उपस्थित होते.