नळदुर्ग , दि . २८
सोलापूर सिंहगड इन्स्टिट्यूट केगाव येथे दुसऱ्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत मानमोडी ता .तुळजापूर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लाठी स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली. विजेत्या खेळाडू व मुख्याध्यापक विक्रम पाचंगे यांचे सर्वञ कौतुक व आभिनंदन केले जात आहे.
यामध्ये प्रसाद दिनेश राठोड सुवर्ण पदक ,दीपक कदम ,आर्यन सुरवसे, कृष्णा सुरवसे ,आर्यन आडे, यश राठोड, श्रद्धा सुरवसे ,अंकिता सुरवसे, सोहम कदम सिल्वर मेडल, व शुभम कदम आदी विद्यार्थ्यांनी ब्रांझ या पदकांची कमाई केली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र,कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश ,बिहार आदी राज्यातून स्पर्धक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उत्तम प्रकाश खंदारे माजी आमदार तथा क्रीडा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, सौ सविता व्हंडरे निष्ठा इंडिया अँटिकरप्शन कौन्सिल अध्यक्ष, शिवकन्या शिवानी देशमुख,सुभाष चौगुले सामाजिक कार्यकर्ते केगाव , मोहिते सुभाष महागुरू ,राष्ट्रीय अध्यक्ष अजय शहा, सायराबानू शेख राष्ट्रीय लाठी महासचिव ,माशाळे फाउंडेशन समन्वयक ,प्रकाश चव्हाण जिल्हा परिषद सदस्य उस्मानाबाद, प्रशांत नवगिरे जिल्हाध्यक्ष मनसे उस्मानाबाद ,सतिष पिसे , धनराज रेणुके मुख्याध्यापक संभाजी नगर जळकोट, गुणवंत चव्हाण फाउंडेशन जिल्हा समन्वयक उस्मानाबाद, शिवानंद अंकलकोटे सामाजिक कार्यकर्ते, श्रीशैल व्हंडरे सामाजिक कार्यकर्ते, दत्ता सामंत सामाजिक कार्यकर्ते सोलापूर ,तुकाराम डिगोळे वन परिमंडळ अधिकारी उमरगा ,माधव डिगोळे ,भोसले प्रकाश, शिवराम भोसले, विक्रम पाचंगे मुख्याध्यापक मानमोडी महंमदरफी शेख टेक्निकल डायरेक्टर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी लाठी हा शिवकालीन पारंपारिक खेळ आहे व तो सर्वांनी जोपासला पाहिजे अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तम प्रकाश खंदारे यांनी व्यक्त केली. तर लाठी हा खेळ आजच्या परिस्थितीला खूप महत्त्वाचा असून महिला सक्षमीकरणासाठी व सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे अशी प्रतिक्रिया सविता व्हडरे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक विक्रम पाचंगे यांनी मानले.