चिवरी , दि.११ : राजगुरू साखरे
तुळजापूर तालुक्यातील चिवरी ते अणदुर हा सात किलोमीटर अंतराचा डांबरी रस्ता आहे. विविध दैनिकातून या रस्त्याची दयनीय अवस्था वारंवार समोर आणल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या रस्त्यावरती असलेली खड्डे बुजवण्याचे काम मागील महिन्यापासून हाती घेतलले आहे.माञ हे काम अतिशय निकृष्ट दर्जाची करण्यात आले आहे. यामध्ये डांबर कमी आणि खडी जास्त वापरल्यामुळे खडी पूर्णपणे रस्त्यावर उखडलेली आहे.
या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असतानाही केवळ चार ते पाच ठिकाणीच खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आली आहे, विशेष म्हणजे या रस्त्यावरील दोन किलोमीटर रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली असताना तेथील एकही खड्डा बुजवण्यात आलेला नाही. त्यामुळे काम नको पण गुत्तेदार आवरा अशी म्हणण्याची वेळ येथील ग्रामस्थांना आली आहे. रस्ता दुरुस्तीचे राहिलेले अर्धवट काम कोण आणि कधी करणार ? असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.
या रस्त्यावर डांबर कमी आणि खडीचा वापर जास्त केल्यामुळे दुचाकी घसरून पडण्याचा धोका वाढला आहे. येथील जागृत देवस्थान महालक्ष्मीच्या दर्शनासाठी शेकडो भाविक मंगळवार ,शुक्रवार, अमावस्या-पौर्णिमेला येत असतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे भाविकांसह ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. एकंदरीत येथील रस्त्याचे अर्धवट काम व थातूर मातूर करण्यात आलेले खड्डे बुजविण्याचे काम याची चौकशी करण्यात यावी व चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे, अन्यथा येथील ग्रामस्थ येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.
चिवरी -अणदुर रस्त्याचे अर्धवट काम करण्यात आले आहे तसेच जिथे रस्ता खराब झाला आहे तिथे माञ साधी डागडुजीही सुद्धा करण्यात आली नाही, त्यामुळे वाहनधारकांसह ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहे, त्यामुळे या रस्त्याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून रस्ता खड्डेमुक्त करावा.
तानाजी जाधव ( शिवसैनिक) चिवरी
रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे, विद्यार्थी वयोवृद्ध व्यक्ती, महालक्ष्मीचे भाविक यांच्यासह ग्रामस्थांना या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे या रस्त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्ता चांगल्या दर्जाचा करण्यात यावा करण्यात यावा.
विठ्ठल होगाडे. ( महालक्ष्मी मोफत करिअर अॅकाडमी संस्थापक अध्यक्ष चिवरी.)