काटी , दि . ११
तुळजापूर तालुक्यातील काटी- केमवाडी हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसाळ्यात तर या मार्गांवर वाट शोधणे मुष्किल असते. खराब रस्त्यामुळे खरीप पिके,रब्बी पिके,भाजीपाला,उस वाहतुक ही अतिशय अडचणीची ठरत आहे.
हा काटी ते केमवाडी रस्ता लवकरात लवकर दुरूस्ती करून खडीकरण,मजबुतीकरण व डांबरीकरण करावे असे निवेदन खासदार ओम राजेनिंबाळकर यांना काटी ग्रामस्थांच्यावतीने शुक्रवार दि.11 रोजी देण्यात आले.हे निवेदन देतांना सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, ग्रा.पं.सदस्य जितेंद्र गुंड,अहमदखान पठाण,शामराव इंगळे, प्रा.अभिमान हंगरकर आदी उपस्थित होते.