तुळजापूर , दि . ११

एकल महिला संघटना संचलित स्वावलंबी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. ची स्थापना मागच्या वर्षी 25 फेब्रुवारी रोजी झाली. त्या निमीत्ताने पहिल्या वर्धापन दिन यावर्षी 10 मार्च रोजी  उस्मानाबाद आणि 11 मार्च रोजी तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.


या कार्यक्रमात हंगरगा तूळ येथील "झाशीची राणी महिला मंडळ यांना आदर्श महिला मंडळ म्हणून सन्मान करण्यात आला तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  खाडे ( पशु धन अधिकारी, तुळजापूर)  गणेश चादरी ( टाटा समाज विज्ञान महाविद्याल तुळजापूर ), शिशिर सावंत ( कोरो इंडिया )यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वावलंबी पतसंस्थेच्या अध्यक्षा कांता शिंदे आणि एकल महिला संघटनेच्या तुळजापूर तालुका अध्यक्षा पार्वती भगत यांची उपस्थिती होती.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वावलंबी पतसंस्थेच्या वार्षिक कामाचा आढावा  सचिव सुरेखा भोसले यांनी मांडला. सूत्रसंचालन महानंदा चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सुवर्णा ननावरे, उर्मिला म्हणकराज, उजवला मगर, आश्विनी व्हरकट, रोहिणी गायकवाड, अनिता जाधव, सुनीता देडे, प्रियांका पासले, पार्वती मस्के, उजवला पवार यांनी परिश्रम घेतले.
 
Top