कळंब , दि . ११

 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन व राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे शुक्रवार दि. १८ मार्च रोजी सकाळी १० वाजता   कर्नाळा स्पोर्ट क्लब पनवेल जि.रायगड येथे आयोजन केले असल्याची माहीती प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.


या  अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे,शालेयशिक्षण मंत्री ना.वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री ना.अदित्य ठाकरे, जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ,महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, शालेयशिक्षण राज्य मंत्री ना.ओमप्रकाश  उर्फ बच्चु कडु, ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार, नगरविकास राज्य मंत्री ना.  प्राजक्त तनपुरे, रायगड जिल्ह्याच्या पालक मंत्री श्रीम.ना.अदिती तटकरे  इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


या अधिवेशनात शिक्षक नेते संभाजी थोरात यांच्या नेतृत्वाखाली  राज्यातील विद्यार्थी ,शिक्षक व शाळेचे विविध प्रलंबित व महत्त्वाचे प्रश्न मांडण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागु करणे,  सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुर करुन खंड २ प्रसिद्ध करणे,आंतरजिल्हाबदली साठी राज्य रोष्टर मंजूर करणे,वस्तीशाळेतील शिक्षकांची मुळ नेमणूक दिनांक ग्राह्य धरणे, वैद्यकीय उपचारासाठी शिक्षकांना कँशलेश सुविधा मंजूर करणे,शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागु करणे,नगर पालीका व महानगरपालीका शाळेतील शिक्षकांच्या वेतनासीठी १००% आर्थिक तरतूद करणे, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करुन प्रतीमहा ३० हजार रुपये करणे, विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी लागु करणे, केंद्रप्रमुखाची १००% पदे पदोन्नतीने त्वरीत भरणे, प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना उच्चशिक्षणासाठी फी माफीची सवलत पुर्ववत देणे, २४ वर्ष सेवा झालेल्या  शिक्षकांना विना अट निवडश्रेणीचा लाभ देणे,शिक्षकांना इतर कर्मचाऱ्याप्रमाणे रजा रोखीकरणाचा लाभ देणे, स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेत इ-लर्निंग सुविधा देणे, इयत्ता १ ली ते ८ वीच्या १००% विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणे, कमी पटसंख्येमुळे शाळा बंद करु नयेत, शाळेचे विजबील शासनाने भरावे, विनंती बदलीसाठी ३ वर्ष अट ठेवावी, शाळेसाठी सादिल खर्च द्यावा, शाळेला सेवक व लिपीकाची पदे मान्य करावीत, जिल्हापरिषद च्या शाळेला ५ वी व ८ वीचे वर्ग जोडावेत यासह एकुण ३५ मागण्या सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे .

अधिवेशन व शिक्षण परिषदेला उपस्थित राहण्यासाठी राज्यातील शिक्षकांना दि.१५ मार्च ते १८ मार्च अशी चार दिवसाची विशेष रजा [ओनडीयुटी] राज्य शासनाने मंजूर केलेली आहे.
 तरी राज्यातील शिक्षकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे ,राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले,अशोक जाधव,राज्य चिटणीस भक्तराज दिवाने, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे , एल.बी.पडवळ,विभागीय कार्याध्यक्ष अर्जुन गुंजाळ, जिल्हासरचिटणीस विठ्ठल माने,कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे ,कार्याध्यक्ष श्रीनिवास गलांडे,व्यंकट पोतदार,प्रसिद्धी प्रमुख,बालाजी माळी,प्रदिप म्हेत्रे,प्रवक्ता उमेश भोसले, संपर्क प्रमुख धनाजी मुळे.रणजित पाटील, विजय ओवांडकर  तालुकाध्यक्ष राहुल भंडारे [उस्मानाबाद ] दत्तात्रय पवार [कळंब ]संतोष मोळवणे [वाशी] डी.डी.कदम [तुळजापुर] रामेश्वर शिंदे[भुम] शिवाजी शिंदे[ परांडा] बालाजी मसलगे [उमरगा] सुदर्शन जावळे [लोहारा]
महिला आघाडीच्या श्रीमती रोहीणी माने,श्रीमती जेमिनी भिंगारे,श्रीमती अरुणा वाघे,श्रीमती मनिषा ताकपिरे यांनी केले आहे.


 
Top