कळंब , दि . ११


जि. प. हसेगाव के शाळेत महिला दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.सर्व प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यानंतर शाळेतील शिक्षिका श्रीमती लक्ष्‍मी कोकाटे , प्रतिभा बिडवे शाळेतील मुलींनी  महिला दिनाचे महत्त्व माता पालकांना सांगितले, यानंतर माता पालकांच्या रांगोळी स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा, धावण्याची स्पर्धा,संगीत खुर्ची स्पर्धा, घेण्यात आली.


रांगोळी स्पर्धेत सौ स्वाती पांचाळ,अर्चना खरडकर,शिल्पा सोनटक्के, वनिता विभुते यांनी बक्षीस पटकावले तर लिंबू चमचा स्पर्धेत अश्विनी सोनटक्के, विजयश्री सोनटक्के,सरस्वती खरडकर यांनी बक्षीस पटकावले.धावण्याच्या स्पर्धेत सोनाली यादव, अश्विनी यादव सीमा चवरे, लक्ष्मी तोडकर यांनी बक्षीस पटकावले तर संगीत खुर्ची स्पर्धेत अर्चना खरडकर, सीमा चवरे, दिव्या कांबळे यांनी बक्षीस पटकावले या स्पर्धेसाठी  भिकाजी जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व  ओंकार पकवे सदस्य यांनी बक्षिसे दिली.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रामेश्वर जगदाळे, श्रीमती लक्ष्मी कोकाटे, प्रतिभा बिडवे विद्या मनगिरे,कालींदा समुद्रे व सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला.
 
Top