नळदुर्ग , दि . ११


 राष्ट्रीय युवा काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या महासचिवपदी भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल नळदुर्ग येथील प्राध्यापका कडून अभिजीत  बाबुराव चव्हाण व जि . प. बाबूराव  चव्हाण या पिता-पुत्रांचा सत्कार करण्यात आला. 


 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अंतर्गत विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महासचिव पदासाठी 217 उमेदवार रिंगणात होते. त्यात अभिजीत भैय्या चव्हाण यांनी 98 हजार 257 एवढे मतदान घेऊन अग्रस्थानी येण्याचा मान मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल नळदुर्ग येथील प्राचार्य डॉ. संजय कोरेकर उपप्राचार्य डॉ. रामदास ढोकळे यांच्या हस्ते सत्कार करुन पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 


यावेळी अभिजीत  चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचवण्याचा मानस व्यक्त केला व त्याचबरोबर युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे काही करता येईल ते ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन असे  सांगितले .     

प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यानी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. मनोज झाडे, डॉ. सुभाष राठोड, डॉ. विजय सावंत,  प्रा. चाँद कुरेशी, डॉ. लक्ष्मण थिट्टे, डॉ. संतोष पवार, डॉ. निलेश शेरे, प्रा. हणमंत पाटील, डॉ. एस. ए. इनामदार, डॉ. अमर गडदे हे उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. संतोष पवार यांनी केले.
 
Top