काटी , दि . ११
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सागर राजकुमार घडमोडे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट बॅंक कर्मचारी म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने पुरस्कार वितरण विचारवंत हभप शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, साहित्यिक रमेश आव्हाड, प्रमुख पाहुण्या डॉ.जे. सानिपीना राव यांच्या हस्ते पुणे येथील एस.पी. महाविद्यालयात
"गुणिजन गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते इसाफ को- ऑपरेटीव्ह बॅंक शाखा मंगळवेढा येथे असिस्टंट कस्टमर सर्व्हिस मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील विविध क्षेत्रातील आपआपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 105 मान्यवरांना "गुणिजन गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सागर घडमोडे म्हणाले की, या पुरस्काराचे सर्व श्रेय बॅंकेचे अध्यक्ष, संचालक, ठेवीदार, बॅंक कर्मचारी, व्यापारी, माझी आई आशा राजकुमार घडमोडे, बहिण पल्लवी वाकळे, शितल घडमोडे,बसलिंग किलचे, सविता किलचे, दयानंद जवळगावकर, प्रशांत मिटकर व मला मार्गदर्शन करणारे शिक्षकवृंद यांना जात असल्याची भावना व्यक्त केली.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी सुप्रसिद्ध विचारवंत हभप शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर, साहित्यिक रमेश आव्हाड, डॉ.जे. सानिपीना, महापरिषेद समन्वय प्रकाश सावंत, सौ. मिनाक्षी गवळी, मनिषा कदम, स्वागताध्यक्ष एल.एस. दाते, चंद्रहास गावंड, अमोल सुपेकर, शशिकांत सेलुरकर, आई आशा घडमोडे, पल्लवी वाकळे आदी उपस्थित होते.