उस्मानाबाद , दि . ११


शहरातील बार्शी नाका,तांबरी विभागातील  सुर्यकांत श्रीधरराव पाटील यांचे सुपुत्र सौरभ पाटील हे नुकतेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट या संस्थेची परिक्षा उत्तीर्ण झाले. हे घवघवीत यश मिळवुन  सी.ए. झाल्याबद्धल येथील रूक्मिणी फाऊंडेशन तर्फे सौरभ पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे सचिव प्रा.अभिमान हंगरकर यांच्या हस्ते  श्रीफळ,शाल, पुष्पगुच्छ  देऊन  सत्कार करण्यात आला.
    

या प्रसंगी सौरभचे वडील सुर्यकात पाटील,आई सुनिता पाटील,प्रा.अभिमान हंगरकर, सौ.सुनंदा हंगरकर,नुतन संचालक अनिल हंगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top