काटी , दि . ११
तुळजापूर तालुक्यातील काटीचे निवृत्त प्राध्यापक अभिमान हंगरगेकर यांचे सुपुत्र व सध्या ब्रह्नमुंबई महापालिकेत दुय्यम अभियंता या पदावर कार्यरत असणारे यशपाल हंगरगेकर यांची सहाय्यक अभियंता पदावर पदोन्नती झाली आहे.
हंगरगेकर हे मुंबई महापालिकेत ए वार्ड मद्धे दुय्यम अभियंता (सब इंजिनिअर ) या पदावर कार्यरत होते.दि.7 मार्च रोजी त्यांना पदोन्नती आदेश प्राप्त झाला.व दि.9 मार्च रोजी ते एफ(एन)वार्ड येथे सहाय्यक अभियंता या पदावर रूजू झाले. या पदोन्नती झाल्याबद्धल त्यांचे मित्र, नातेवाईक,कुटुंबियांनी अभिनंदन केले आहे.